ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
कोकण रेल्वे मार्गावर ५ व ७ सप्टेंबरला दोन ठिकाणी मेगाब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी तर कर्नाटक राज्यातील सेनापुरा ते ठोकुर दरम्यान दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या मालमत्ता देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या एकूण पाच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:20 ते सायंकाळी 3.20 असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच कर्नाटकमधील सेनापुरा ते ठोकुरदरम्यान गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
- १) कोईमतूर-जबलपूर (02297) ही दि. 4 सप्टेंबरला प्रवास सुरू होणारी एक्सप्रेस मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे 90 मिनिटे रोखून ठेवली जाईल.
- २) सावंतवाडी रोड दिवा जंक्शन एक्सप्रेस (10106) ही दिनांक पाच सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी सावंतवाडी ते चिपळूण दरम्यान 90 मिनिटे थांबवून ठेवली जाईल.
- ३) लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) दिनांक 5 सप्टेंबर रोजी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे 30 मिनिटे थांबवून ठेवली जाईल.
- ४) मंगळूर सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी मेमू एक्सप्रेस (10108) जिचा प्रवास सात सप्टेंबर रोजी सुरू होतो ती दुपारी 3.30 ऐवजी मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी चार वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे ( 75 मिनिटे विलंबाने ).
- ५) मंगळुरू ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी (12134) सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 7 सप्टेंबर रोजी एक तास उशिरा म्हणजे निर्धारित 4 वाजून 35 मिनिटांनी ऐवजी 5 वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सोडली जाणार आहे.