जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज
इन्स्टिट्यूटचा दहावीचा निकाल १०० टक्के
नाणीज : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी १०० टक्के लागला. या प्रशालेच निकाल सालाबाद प्रमाणे यंदाही शंभर टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी गोरगरीब व होतकरू मुलांसाठी नाणीज या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाची प्रशाला २००९ साली सुरू केली आहे. या प्रशालेची गुणवत्ता वर्षानुवर्षे वाढत चाललेली आहे, हे या निकालांवरून दिसून येते. आज २ जून रोजी एसएससी बोर्डाचा निकाल लागला.
या परीक्षेमध्ये कु. सरोज इंद्रजीत सूर्यवंशी ही ९३.६० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये प्रथम आली. सुयश गौतम सोनकांबळे ९३.४० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय आला. ज्योतिरादित्य माणिक पाटील हा ९२.६० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये तृतीय आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक कीर्ती कुमार भोसले प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले तसेच सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व गुणवत्ता यादी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभाशीर्वाद दिले आहेत.