रत्नागिरी अपडेट्सस्पोर्ट्स

जागतिक ब्लॅक बेल्टसह राष्ट्रीय पंच व रिफ्रेशर परीक्षेसाठी संगमेश्वरच्या तायक्वांदोपटूंची निवड


देवरू़ख : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुंबई च्या अंतर्गत रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीनं जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षा व राष्ट्रीय पंच आणि रिफ्रेशर परीक्षा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल रत्नागिरी या ठिकाणी सपंन्न होत आहेत.


या परिक्षा तायक्वांडो फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बरगजे,जॉइंट सेक्रेटरी.महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष व छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे ,जिल्हा अध्यक्ष रा वेंकटेश्वरराव कर्रा,उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण के.,कोषाध्यक्ष शशांक घडशी याचे मार्गदर्शनखाली होणार आहेत.

या परीक्षेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी अंतर्गत नगरपंचायत देवरूख, निवे क्लब, लायन्स क्लब संगमेश्वर, पि.एस.बने क्लब यांच्या वतीनं निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार व शुभेच्छा समारंभ डॉ. बाबासाहेब स्मारक सभागृह देवरूख या ठिकाणी पार पडला. यावेळी क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, उपाध्यक्षा सौ.ॲड पुनम चव्हाण, संदेश जागुष्टे ,तांत्रिक प्रमुख चिन्मय साने, आदी उपस्थित होते.

जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षा व रेफ्री, रिफ्रीशर परीक्षेसाठी निवड झालेल खेळाडू


ब्लॅक बेल्ट
तनिष खांबे,यश जाधव,दुर्वा जाधव,अद्वैत नार्वेकर,पियूष सागवेकर,समृद्धी घडशी,सिया सागवेकर,समीक्षा पाटील,नेहा सावंत,राहुल चव्हाण,सुमित पवार,ईशा रेडिज, ऋतू करंजळकर,साहिल जागुष्टे, सान्वी जागुष्टे,श्रावणी इप्ते, कानका नोन्हारे, अथर्व यादव, आर्या कोळपे, सारथी धावडे,स्वराली शिंदे,आयुष वाजे,
ब्लॅक बेल्ट 2nd dan
धनंजय जाधव,साहिल घडशी,तनुश्री नारकर,
राष्ट्रीय पंच
राहुल चव्हाण,साईप्रसाद शिंदे,सुमित पवार,साहिल घडशी
राष्ट्रीय पंच रिफ्रेशर
गायत्री शिंदे,स्वप्नील दांडेकर
या सर्व निवड झालेले खेळाडूंचे तालुका अकॅडमी चे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरूख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये आदींनी शुभेच्छा दिल्या.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button