दबा धरून बसलेल्या हल्लेखोराच्या प्राणघातक हल्ल्यात कॉलेज युवतीचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील भालावली येथील घटना
राजापूर : तालुक्यातील भालावली येथे दोन महाविद्यालयीन मुलींवर दबा धरुन बसलेल्या एका प्रौढाने तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करुन मैत्रिणीला सोडवण्यासाठी आलेल्या मुलीला ठार मारल्याची घटना घडली आहे. यात अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या दोन्ही मुली येथील कॉलेज अटेंड करून घरी जात असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यातील संशयिताने जमिनीच्या वादातून हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यामध्ये साक्षी मुकुंद गुरव (20, गुरववाडी) या युवतीने आपला प्राण गमवावा लागला आहेत आहे. सिद्धी संजय गुरव (21 ) नामक दुसऱ्या गंभीर जखमी मुलीला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विनायक शंकर गुरव या 55 वर्षीय संशयीताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नाटे येथील सागरी पोलीस ठाण्यामार्फत या घटनेचा अधिक तपास सुरू आहे