पाली ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिसची सुविधा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली. या भेटी वेळी त्यांनी तेथील डायलिसिस सेंटरची पाहणी केली.

रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत पालकमंत्री डॉ. सामंत यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेतला.

रुग्णसेवेतील सुधारणा, सुविधा आणि स्थानिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेची गुणवत्ता याबद्दल माहिती घेतली. ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे डायलिसिस केंद्र महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आहे, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment