बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये संगमेश्वरच्या तायक्वांडोपटुंचे सुयश
देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व राज्य संघटनेचे व्यंकटेश कररा व शशांक घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकर सभागृह देवरुख येथे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा संपन्न झाली.
यावेळी देवरुखच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व प्रफुल भुवड. क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, उपाध्यक्षा अँड. पूनम चव्हाण, संदेश जागुष्ठे राजेंद्र पवार, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर,आधी उपस्थित होते. या बेल्ट ग्रेडेशन परिक्षेसाठी तालुक्यातील नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, निवे तायक्वांडो क्लब, पी. एस. बने तायक्वांडो आणि लायन्स तायक्वांडो क्लब संगमेश्वर या सर्व क्लब च्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
यशस्वी खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :
येलो – लक्ष्मी मोघे, सोहम नटे,वेदांत मसुरकर,श्रेया फाटक, तनिष्का आनेराव,शौर्य साठे, पल्लव वनकर, पूर्वा रहाटे,ध्रुवा शिंदे,सोहम पवार, अजिंक्य शिंदे, आदित्य आंबकर, लुब्धा सावंत,सोहम मालगुंडकर,
ग्रीन – पूर्वा वनकर,दुर्गा मोघे, सोमांश सावंत, शौर्य माळी, प्रणित कांबळे, मंथन चव्हाण, अथर्व चव्हाण, प्रथमेश कारेकर, प्रथमेश शेट्टे,श्लोक विंचू, कार्तिकी विंचू, रियांश थरवळ,
ग्रीन- वन – श्रेयस गवंडी,प्रणित कांबळे, दशरथसिंग राठोड, साहिल सकपाळ,
ब्ल्यू – दीक्षा मोहिते, साहिल सकपाळ,चैतन्य बांबाडे,अफजान फुलारी, दशरथसिंग राठोड,विश्वम मुरुडकर,प्रणित कांबळे,
ब्लू – वन – ओम घाग, दिक्षा मोहिते, साहिल सकपाळ, दशरथसिंग राठोड,शौर्य लोध,विहंग मुरुडकर.
रेड– ओम घाग ,गंधर्व शेट्टे,श्रद्धा देवरुखकर, दुर्वा देवरुखकर,दिक्षा मोहिते, अनन्या पवार,साहिल सकपाळ,दशरथसिंग राठोड.
रेड वन – दीक्षा मोहिते, साहिल सकपाळ, अभिषेक रसाळ.
या सर्व यशस्वी खेळाडूंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष व माजी आम. डॉ.सुभाष बने, राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कर्रा, उपाध्यक्ष परेश खातू, जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने,टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, पंकज मेस्त्री,क्लब सदस्या स्वाती नारकर, निवे क्लब अध्यक्ष श्रीकांत यादव. आदींनी शुभेच्छा दिल्या.