रत्नागिरी अपडेट्सस्पोर्ट्स

बॉडी बिल्डींग अँड फिसिक स्पोर्ट्स असोसिएशनची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी संदीप उर्फ बावा नाचणकर तर उपाध्यक्षपदी इरफान काद्री आणि अभिजीत वाघधरे यांची निवड


रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यातील जीम मालकांच्या अडचणी आणि समस्यांवर एकत्र येऊन उपाय शोधणे सध्याच्या काळात गरजेचे बनले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जीममालकांनी एकत्र येऊन बॉडी बिल्डींग अँड फिसिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी डिस्ट्रिक्टची स्थापना केली असून या असोसिएशनची नोंदणी करण्यात आली. नोंदणी झाल्यानंतर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप उर्फ बावा नाचणकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी चिपळूणचे इरफ़ान काद्री आणि लांजाचे अभिजीत वाघधरे यांची निवड करण्यात आली आहे. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

बॉडी बिल्डींग अँड  फिसिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कार्यकारिणीच्या निवडी प्रसंगी.


अध्यक्षपदी संदीप कृष्णा नाचणकर, रत्नागिरी, उपाध्यक्षपदी इरफान सय्यद इब्राहीम काद्री, चिपळूण, उपाध्यक्षपदी अभिजीत सुरेश वाघधरे, लांजा, सचिवपदी वैभव काशीनाथ कांबळे, रत्नागिरी खजिनदारपदी भूषण सुधीर शिंदे, चिपळूण, सहसचिवपदी अमोल दिनेश जाधव, रत्नागिरी, सहखजिनदारपदी महेश मनोहर वादक, दापोली, सदस्यपदी – शशिकांत धोंडीराम भुरण, चिपळूण, आकाश मोहन पाटील, चिपळूण, सुरज रमेश पाटणे, खेड, प्रशांत महेंद्र सावंत, खेड, राज दिलीप कारेकर, खेड, सदानंद दिलीप बारटक्के, दापोली, उदय संभाजी ओतारी, चिपळूण, दुष्यंत संदेश पाथरे, राजापूर, दशरथ दाजी सापटे, मंडणगड, प्रणिता शिवाजी घाडगे, चिपळूण, हेमंत शांताराम जाधव, रत्नागिरी, निता संजय वारेकर, मुंबई यांचा या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ही कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button