माधवबाग रत्नागिरीतर्फे उद्या सकारात्मक दृष्टिकोन विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा
रत्नागिरी : सकारात्मक दृष्टिकोन हा भावनिक, वैचारिक व आध्यात्मिक पातळीवर असणे फार गरजेचे असते. भावनिक ताण चांगल्याप्रकारे कसे हाताळावे हे जाणून घेता यावेत याकरता शनिवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी माधवबागच्या रत्नागिरी शाखेमध्ये सकारात्मक दृष्टीकोन या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही शाळा सर्वांसाठी मोफत आहे.
आजारावर विजय मिळवण्यासाठी केवळ शारीरिक पातळीवर प्रयत्न करून चालत नाही, तर मानसिक पातळीवर जोपर्यंत बदल घडत नाहीत तोपर्यंत आजार बरा होत नाही. जसे आपण पाहता की, मानसिक स्थितीचा शरीरातील संप्रेरकस्राव व रक्ताभिसरण यांच्यावर सततचा परिणाम होत असतो. माणसाच्या भावनिक बदलांमुळे व ताणतणावामुळे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. मानसिक ताणतणाव हा किचकट प्रकार आहे व तो समजावून सांगणेही फार कठीण आहे. कारण, एखाद्या माणसासाठी तणावदायक स्थिती ही दुसऱ्या माणसासाठी सहजस्थिती असू शकते. सकारात्मक दृष्टिकोन हा यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो.
ताणतणाव हे सर्वच लोकांना असतात. परंतु, ते आपण कसे हाताळतो, हे फार महत्त्वाचे असते. सकारात्मक दृष्टिकोन हा भावनिक, वैचारिक व आध्यात्मिक पातळीवर असणे फार गरजेचे असते. चला तर मग भावनिक ताण चांगल्याप्रकारे कसे हाताळावे हे जाणून घेण्या साठी शनिवार दि. 07/जानेवारी 2023 रोजी माधवबाग आयोजित सकारात्मक दृष्टीकोन या ऑनलाईन कार्यशाळेला समोर दिलेल्या लिंक ला क्लीन करून जॉईन करूया.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरीतील सहाय्यक प्रशासन अधिकारी – श्री. मोहन नागरगोजे असणार आहेत.
दि. ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता
ठिकाण : तुमच्याच मोबाईलवर, तुमच्याच घरी.
या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये zoom app डाऊनलोड करा.
🔸खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कार्यक्रमाचा आनंद घ्या.
🔸कार्यक्रम सर्वांसाठी आहे.
Team Madhavbaug is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: हार्दिक विषय – सकारात्मक दृष्टीकोन
Time: Jan,07 ,2023 10:00 AM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
https://madhavbaug.zoom.us/j/85936649037?pwd=emp3R2lEWjY5RVBpQmpreG84RnUrdz09
Meeting ID: 859 3664 9037
Passcode: 623545
Join by Skype for Businesshttps
https://madhavbaug.zoom.us/skype/85936649037