रत्नागिरी अपडेट्स

रत्नागिरीतील ‘इस्कॉन’ मंदिरात पंचतत्व अभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : येथील मिरजोळे एमआयडीसीमधील लायन्स आय हॉस्पिटलनजीक श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र मंदिरात आज ( रविवारी) सायंकाळी भगवंतांवर श्री पंचतत्त्व अभिषेक आणि ५६ भोग तसेच प्रवचनादी कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी उपस्थित भाविक भगवतांच्या कीर्तनात रमून गेले.

यावेळी ‘इस्कॉन’च्या मंदिरात सायंकाळी ६.३० ते ६.४५ – गौर आरती, सायंकाळी ६.४५ ते ७.३० – अभिषेक, सायंकाळी ७.३० ते रात्री ८.३० पंचतत्व लीला प्रवचन – श्री रसराज गोपाळ प्रभु, रात्री ८.३० ते ९.०० – आरती, कीर्तन, 56 भोग, तसेच रात्री ९.०० ते ९.३० यावेळेत भाविकांसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button