रत्नागिरी अपडेट्स
रत्नागिरीत पावसाचा शिडकावा
रत्नागिरी : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकणच्या किनारपट्टीवर तापमानात वाढ होण्यासह रत्नागिरी शहर परिसरात बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पावसाचा हलका शिडकावा झाला.
हवामान खात्याने या संदर्भात आधीच इशारा दिला होता. त्यानुसार आज रत्नागिरी तापमानाचा पारा चढून तो एकतीस अंश सेल्सिअस वर स्थिरावला होता. अशातच रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास रत्नागिरी शहर परिसरात पावसाने अत्यंत हलक्या स्वरूपात आपले अस्तित्व दाखवून दिले.