रत्नागिरी अपडेट्स

रत्नागिरी जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन २० फेब्रुवारी रोजी

फोनद्वारे संपर्क साधूनही नोंदविता येणार निवेदन


रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात “जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन ” साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. त्याप्रमाणे माहे फेब्रुवारी 2023 रोजी चा महिला लोकशाही दिन सोमवार 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित केला आहे.

रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने, “रत्नागिरी जिल्हयातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनव्दारे संपर्क करुन दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ वाजता या वेळेत त्यांचे निवेदन/ अर्ज नोंदविता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button