महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजा एसटी आगाराच्या अनेक बसफेऱ्या रद्द

रत्नागिरीतील ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमा’साठी १८ बसेस नेल्याचा परिणाम

लांजा : राज्य सरकारच्याच्या शासन आपल्या दारी या अभियान अंतर्गत आज (गुरुवारी ) रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यकामासाठी लांजा आगाराच्या १८ एसटी बसेस फिरवल्याने तालुक्यातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलल्या. याचा नागरिकांना मोठा मन: स्ताप करावा लागला. याच दरम्यान खासगी वडापच्या वाहनांनी दाम दुप्पट भाडे एकरून आपले उखळ पांढरे करून घेतले.

रद्द झाल्याने लांजा एसटी स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता. खासगी वाहतूकदारांकडून लांजा ते पाली 70 रुपये भाडे आकारले गेले. रत्नागिरी त शासन आपल्या दारी या उपक्रमाला लांजा तालुक्यातील सुमारे 702 लाभार्थी लांजा एसटीच्या 18 बसेस मधून आणण्यात आले होते. ऐन हंगामात एसटी च्या अनेक फेऱ्या वर त्याचा थेट परिणाम झाला लांजा आगारात एकूण 47 एसटी आहेत 18 गाड्या या कार्यक्रमाला वळविण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

एसटी स्थानकात ग्रामीण भागातील मार्गावर फेरी नसल्याने चाकरमानी, उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या नागरिक यांना खासगी रिक्षा वडाप यांचा आधार घ्यावा लागला लांजात रत्नागिरी मार्गावर येणारे वडापवाले प्रवाशांकडून 80 ते 90 रुपये भाडे घेत असल्याची ओरड आहे. लांजा येथून पाली त जाणाऱ्या एका प्रवाशाकडून 70 रुपये भाडे घेण्यात आले. ही माहिती प्रवाशी बंटी सावंत यांनी दिली. रद्द एसटी बसेसमुळे प्रवाशांनी लांजा आगाराच्या भोंगळ कारभार बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

लांजा तालुका शिवसेनाप्रमुख आणि सेना एसटी संघटना अध्यक्ष संदीप दळवी यांनी शासन आपल्या दारी योजना हा उपक्रम राबविण्यात येत आहे ही बाब चांगली आहे. मात्र अनेक नागरिकांना एसटी फेऱ्या रद्द करून त्याचे हाल करणे कितपत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button