महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सशिक्षण

मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर

  • प्रथम क्रमांक – माधुरी गमरे, द्वितीय क्रमांक- समीर घडशी, तृतीय क्रमांक- नामदेव जाधव

मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व मानवी हक्क अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचे प्रवेश सुरु

रत्नागिरी, दि. १९ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२४ चे निकाल जाहीर झाले आहेत. या मध्ये मानवी हक्क (Human Right) कोर्सचे निकाल जाहीर झाले असून रत्नागिरी येथील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट चा मानवी हक्क अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी एकूण १४ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून सौ. माधुरी जनार्दन गमरे (८४% गुण) या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत तर व्दितीय क्रमांक श्री समीर बाळू घडशी (८३.६७% गुण) आणि श्री. नामदेव आनंदा जाधव (८२% गुण) हे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. मानवी हक्क अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या मध्ये राजेश गोसावी (८१.३३% गुण) व प्रमोद शिंदे (८१.३३% गुण) हे चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण तर पाचव्या क्रमांक- मंगेश बिर्जे (७८% गुण) यांचा आहे. तर गौरव मुळ्ये (७६.६७% गुण), धर्माजी पवार (७६.६७% गुण), दीपक पाटील (७५% गुण), संजय बांडागळे (७२.६७% गुण), पूनम माने (७१.३३% गुण), स्नेहल बामणे (७१% गुण), स्मिता पिलणकर (६९.३३% गुण) आणि अजित आंबवकर (६५.६७% गुण) उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व सेंटरचे केंद्रसंयोजक अंकुश अशोक कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन उपयुक्त अभयसक्रमांचे नवीन बॅचसाठीचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पत्रकार (Journalist) होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.


या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी ई-मेल – rckycmou7380a@gmail.com संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९९२१८७९६६०, येथे संपर्क साधावा.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button