ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सशिक्षण
12th exam result 2025 | राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के निकाल

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज, ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला. यंदा एकूण ९१.८८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत कोकण बोर्डाचा सर्वाधिक 96.74% इतका निकाल लागला आहे.
बारावी परीक्षेचा विभागवार निकाल
- कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४% उत्तीर्णतेची नोंद केली आहे.
- लातूर विभागात सर्वात कमी ८९.४६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे आहे:
- कोल्हापूर: ९३.६४%
- मुंबई: ९२.९३%
- छत्रपती संभाजीनगर: ९२.२४%
- अमरावती: ९१.४३%
- पुणे: ९१.३२%
- नाशिक: ९१.३१%
- नागपूर: ९०.५२%
- शाखावार निकाल:
- विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला आहे.
- वाणिज्य शाखेचा निकाल ९२.६८% आहे.
- कला शाखेतील ८०.५३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८३.३% आहे.
मुलींची बाजी:
यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून, त्यांचा उत्तीर्णतेचा दर ९४.५४% आहे.
निकाल कुठे पाहाल?
विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाइट्सवर आपला निकाल पाहू शकतात: - mahresult.nic.in
- mahahsscboard.org
- mahahsscboard.in
- hsresult.mkcl.org
यासोबतच, education.indianexpress.com या वेबसाइटवर देखील विद्यार्थी विनामूल्य नोंदणी करून आपला निकाल पाहू शकतील.
३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य:
यावर्षी ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य लागला आहे, जी चिंताजनक बाब आहे.
पुढील प्रक्रिया :
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका लवकरच त्यांच्या महाविद्यालयांमधून मिळतील. जे विद्यार्थी निकालावर समाधानी नाहीत, ते पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासंबंधीची माहिती लवकरच बोर्डाच्या वेबसाइटवर जारी केली जाईल. - हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा
- Konkan Railway | खेड रेल्वे स्थानकात एक्झिक्युटिव्ह लाऊंजची सुविधा