Adsense
महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी

Good News !! शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात


रत्नागिरी, दि. ११ : दहावी नंतरच्या तंत्रनिकेतन (Polytechnic) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रियेकरिता येथील शासकीय तंत्रनिकेतन (FC 3009) हे सुविधा केंद्र सुरू आहे.


शासकीय तंत्रनिकेतन संस्थेमध्ये एकूण ४८० विदयार्थी प्रवेश क्षमतेसह स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता १२०, संगणक (Compuuter) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता – ६०, विदयुत (Electrical) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता -६०, अणुविद्युत (Electronics & Tele Communication) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता ६०, यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी प्रवेश क्षमता – १२०, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रवेश क्षमता – ६० या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी दहावी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी विहीत मुदतीत प्रवेश अर्ज निश्चिती करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. रा. रे. वाकोडकर यांनी केले आहे.


ऑनलाईन अर्ज भरणे – दि.२९.०५.२०२४ ते २५.०६.२०२४, कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती – दि.२९.०५.२०२४ ते २५.०६.२०२४, तात्पुरती गुणवत्ता यादी – दि. २७.०६.२०२४, गुणवत्ता यादीवरील आक्षेप / अर्ज दुरुस्ती दि.२८.०६.२०२४ ते ३०.०६.२०२४, अंतिम गुणवत्ता यादी – दि.०२.०७.२०२४ रोजी असे वेळापत्रक असणार आहे.
डिप्लोमा प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर Option Form भरणे, विविध प्रवेश फेऱ्या इ. (Cap round ) निवड झालेल्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चिती इ. बाबतचे वेळापत्रक Poly24.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. विदयार्थ्यांनी Poly24.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज ४००/- रू. तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३००/- रू आहे. ऑनलाईन पध्दतीमध्ये E-Scrutiny व Physical Scrutiny (प्रत्यक्ष हजर राहून पडताळणी ) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामधील E-Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विदयार्थ्यांना कोणत्याही सुविधा केंद्रावर (FC) न जाता स्वतः कागदपत्रे Upload करण्याची सुविधा असुन त्यांची कागदपत्रे व अर्ज सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पडताळून निश्चित करण्यात येतील. तसेच Physical Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विदयार्थ्यांना सुविधा केंद्रावर (FC) प्रत्यक्ष हजर राहून स्वतः च्या अर्जांची नोंदणी व कागदपत्रे Upload करून घ्यावी लागतील.
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे विदयार्थ्यांना दर्जेदान करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

विदयार्थ्यांसाठी ०६ आठवडयाचे औदयोगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ठ आहे. त्याचाच परिणाम म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात ६८ विदयार्थ्यांची विविध नामवंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांतर्फे Campus Placement झाले असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात बऱ्याच विदयार्थ्यांचे Campus Placement झालेले असून अजूनही प्रक्रिया ‘ सुरू आहे.
प्रवेशासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
अधिवास दाखला / जन्म दाखला / राष्ट्रीयत्व दाखला / शाळा सोडल्याच्या दाखल्यावर राष्ट्रीयत्वाची नोंद / Indian Passport, जातीचा दाखला (आवश्यक असल्यास), नॉन क्रिमेलीअर सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास), उत्पन्न दाखला (आवश्यक असल्यास), EWS सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास), विदयार्थ्यांचा Passport Size Photo, E-mail ID (रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक), मोबाईल नंबर (रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक ). अधिक माहितीसाठी अ. आ. मुळये – ९८९०४७६९९५,नु. तौ. काझी – ९२८४५०६०५२, श्या. पां. ठाकरे – ९४२२१५८००३ या प्राध्यापकांची मार्गदर्शन व समुपदेशन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून विदयार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिये संदर्भातील माहितीसाठी या प्राध्यापकांच्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button