Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटनासाठी मडगावमध्ये दाखल
मडगावमध्ये तयारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमधून करणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन
मडगाव : देशभरातील पाच वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत या स्वदेशी हाय स्पीड ट्रेन ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा देखील समावेश आहे. मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मंगळवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या उद्घाटनासाठी हा डब्यांची नवी कोरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून मडगावला रविवारीच दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील या पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाची जोरदार तयारी गोव्यात करण्यात आली आहे.
22 229 /22 230 या क्रमांकासह कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे ऑनलाइन तसेच आरक्षण खिडक्यांवरील बुकिंग सोमवारी सकाळी सुरू झाली आहे. वंदे भारत संदर्भात उत्सुकता असलेल्या अनेकांनी या गाडीच्या 28 पासून सुरू होणाऱ्या नियमित फेऱ्यांकरता आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवारी शुभारंभानंतर वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या दिनांक 28 जूनपासून सुरू होत आहेत. पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई मडगाव मार्गावर सोमवार बुधवार व शुक्रवारी ही गाडी धावेल तर मडगाव मुंबई मार्गावर मंगळवार गुरुवार व शनिवारी ही गाडी धावेल.
बिगर पावसाळी हंगामात शुक्रवार वगळून ही गाडी सहा दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावेल.