महाराष्ट्र
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करणार
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा नुकसानग्रस्तांना दिलासा
मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचा पंचनामे करण्याचे आदेश आज मुख्यमंत्री देतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांना दिली.
भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अवकाळी पावसाचे पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.