अवघ्या ३०० रुपयात करा रत्नागिरी दर्शन!
एसटीची रत्नागिरी दर्शन बससेवा सुरू
रत्नागिरी : नववर्षासाठी रत्नागिरी देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना रत्नागिरीसह नजीकच्या पर्यटनस्थळांना भेटी देणे सोयीचे व्हावे, यासाठी एसटीच्या येथील आगाराने रत्नागिरी दर्शन बस सेवा दि.२८ डिसेंबरपासून सुरू केली आहे.
रत्नागिरीसह नजीकची पर्यटनस्थळे कव्हर करणारी बस सेवा कोरोनापूर्वी सुरू होती. कोरोना संकटकाळात निर्बंध आल्यानंतर रत्नागिरी दर्शन बस सेवा बंद झाली होती. आता नववर्षाचे स्वागत तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रत्नागिरी आगाराने रत्नागिरी दर्शन बससेवा सुरू केली आहे. दिनांक 28 डिसेंबर पासून सुरू झालेली ही व सेवा १ जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहील. या कालावधीत ही बस सकाळी ८ वाजता रत्नागिरी एसटी स्थानकातून सुटणार आहे
मोठ्या व्यक्तीसाठी ३०० रुपयात तर लहान मुलांसाठी १५० रुपयात ही सफर करणे शक्य होणार आहे. रत्नागिरी भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी यासाठी रत्नागिरी आजाराची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी दर्शन बसमधूनमधून आडीवरे, कशेळी कनाकादित्य आदित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशमुळे, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे व पुन्हा रत्नागिरी एसटी बस स्थानक असा या बससेवेचा मार्ग असेल.