महाराष्ट्र

आंबा घाटात टँकरवर दुचाकी आदळून स्वार ठार

अपघातात प्राण गमावलेला दुचाकीस्वार कराडमधील

रत्नागिरी : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील अवघड वळणाजवळ टँकरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. 

लालासो खाशबा शेवाळे (५६ ) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे ते साताऱ्यातील कराडचे रहिवासी होते. तेआपल्या ताब्यातील (MH 50 Q 6184) मोटारसायकलने रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करीत होते तर टँकर (MH10 CQ-5586) रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दिशेने जात होता. आंबा घाटातील अवघड वळणाजवळ दोन्ही वाहने आली असता मोटारसायकल टँकरवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार लालासो शेवाळे हे जागीच ठार झाले. अपघातानंतर मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साखरपा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. 

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button