ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

‘आई तुझं देऊळ’फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञाताने जाळली

  • आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
  • सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.
  • न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद.
  • अज्ञात व्यक्तीचा पोलिसांमार्फत शोध सुरु
  • वारंवार वाहने जाळण्याची घटना घडत असल्याने जसखार गावच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • दोषींना त्वरित अटक करून कारवाई करण्याची सचिन ठाकूर यांची मागणी

उरण दि.९ ( विठ्ठल ममताबादे ) : आई तुझ देऊळ हे गीत संपूर्ण देशभरात गाजत आहे या गीताचे प्रसिद्ध कलाकार, डान्सर / नृत्य दिर्ग्दर्शक, श्री रत्नेश्वरी कलामंचचे संचालक , रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सचिन लहू ठाकूर यांची दि.
5 जानेवारी 2023 रोजी जसखार गावात रूम नंबर 493,रोड जवळ, जसखार येथे उभी असलेले फोर व्हीलर वाहन मारुती सुझूकी सिलेरियो, कार नंबर MH46 BV 2266 हे वाहन अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले होते. त्यावेळी या वाहनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते तेव्हा सचिन ठाकर यांनी त्वरित न्हावा शेवा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र पोलिस प्रशासनाला तो आरोपी पकडण्यात त्यावेळी अपयश आले. त्यानंतर जवळ जवळ 7 महिन्यांनी परत तशीच घटना जसखार गावातील सचिन ठाकूर यांच्या सोबत घडली आहे.

5 जानेवारी 2023 रोजी जी घटना घडली व माझी गाडी जाळण्यात आली त्या घटनेचा योग्य दिशेने तपास जर पोलिसांनी केला असता तर पुन्हा एकदा सात महिन्यांमध्येच माझी गाडी दुसऱ्यांदा जाळली गेली नसती. पोलिसांच्या या भोंगळ कारभारा मुळेच ती व्यक्ती आज मोकाट फिरत आहे व असे कूत्य करत आहे.आरोपी सापडले नसल्याने माझ्या जीवितास खूप मोठा धोका आहे.तो आरोपी पुन्हा असे कृत्य करू शकतो. त्यामुळे पोलिसांनी या गंभीर घटनेची त्वरित दखल घेउन आरोपी शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी.

– सचिन ठाकूर, जसखार ग्रामस्थ, प्रसिद्ध कलाकार.

दि 7 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी सचिन ठाकूर यांची रूम 493, जसखार गाव येथे असलेले मारुती सुझुकी सेलेरियो कार नंबर MH46BV 2266 मागच्या वेळी ज्या पद्धतीने जाळली त्याच पद्धतीने पुन्हा जाळली. सचिन ठाकूर यांचे हे दुसऱ्यांदा वाहन जळाल्याने जसखार गावातील वाहनाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहनाला लागलेली आग सचिन ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी लगेच विझविली. व पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.जवळच सीएनजी टॅंक होता. व आजूबाजूला रिक्षा व इतर वाहने होती. मोठा स्फोट हाऊन इतर वाहनांना आग लागल्याची शक्यता होती. मात्र आग विझविण्यात आली. यात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.अज्ञात व्यक्तीने वाहनाला आग लावल्याने या वेळीही सचिन ठाकूर यांना प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

घडलेल्या घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीचे पाहणी करून सदर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच विविध पुराव्याच्या साहाय्याने आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सदर घटनेचा तपास शीघ्र गतीने आम्ही करीत आहोत.

– बबन सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक,
न्हावा शेवा पोलीस स्टेशन

पहिली घटना घडली तेव्हाही सचिन ठाकूर यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवून पाठपुरावा केला होता. मात्र पोलिस प्रशासना कडुन योग्य ते सहकार्य मिळाले नाही व आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. 5 जानेवारी 2023 रोजी व 7 ऑगस्ट 20213 रोजी सचिन ठाकूर यांचे वाहन अज्ञात व्यक्तीने जाळले. सदर अज्ञात व्यक्तीने अगोदर 5 जानेवारी 2023 रोजी व आता 7 ऑगस्ट 2023 रोजी वाहन जाळले.

जसखार गावात वाहन जळल्याचे लक्षात येताच त्वरित वाहनाची पाहणी करून गुन्हा नोंदविला. आरोपी कोणीही असो. लवकरच त्याला पकडण्यात येईल. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला पकडण्यासाठी त्वरित कारवाई सुरु केली आहे.

– संजीव धुमाळ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन.

दोन्ही तारखेला वाहन जाळणारी अज्ञात व्यक्ती ही एकच असण्याची दाट शक्यता आहे. मात्र सुरवातीपासूनच पोलिसांनी योग्य ते आरोपीचा शोध न घेतल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे सचिन ठाकूर यांनी सांगितले.सुरवातीलाच पहिल्यांदा जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस प्रशासनाने योग्य ते शोध घेत आरोपीचा शोध घेतला असता तर आज ही वेळ आली नसती असे सचिन ठाकूर यांनी सांगितले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button