आदर्श मोठी जुई शाळेत भरला पौष्टिक तृणधान्य पदार्थ महोत्सव!
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग,अंतर्गत रायगड जिल्हा परिषद व उरण पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या सहाय्याने तांदूळ,गहू,ज्वारी,बाजरी,वरी, नाचणी व राजगिरा असे विविध प्रकारच्या तृणधान्याचे पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. त्यामध्ये भाकरी, खीर, लाडू, उपमा,शिरा, लापसी, मोदक, पुरी,चपाती,इडली,अप्पे,भात,चपाती,केक,पापड,कुरडया,वड्या इ.सर्व पदार्थांचे प्रदर्शन केळीच्या पानावर भरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी पर्यवेक्षक कोप्रोली शिवाजी लोहकरे ,अश्विनीताई भोईर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुई, श्रीम.शितल ढाकणे कृषीसहाय्यक कळंबुसरे, निखिल देशमुख कृषीसहाय्यक चिरनेर, तृप्तीताई बंडा उपाध्यक्ष शा.व्यव.समिती मोठीजुई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे रोपवाटिका देउन स्वागत करून प्रास्ताविक केले.या गावचे पालक विद्यार्थी व माझे सर्व शिक्षक वृंद हे मला नेहमीच उत्तम सहकार्य करतात म्हणून शासनाचे व शालेय स्तरावरील सर्व उपक्रम हे यशस्वी होत आहे असे सांगितले.ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अश्विनी लहू भोईर यांनी देखील शाळेतील सर्व उपक्रम हे विद्यार्थी व गावाच्या हिताचे असतात त्यामुळेच ह्या गावाचे व शाळेचे नाव राज्याच्या आदर्श यादीत आले.त्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे असे सांगितले.शिवाजी लोहकरे , शीतल ढाकणे व निखिल देशमुख यांनी खूप सविस्तर मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थी व महिला सदस्य यांना केले.तृणधान्य प्रकार, शरीराला गरज,महत्व व कार्यवाही,आपला भौगोलिक परिसर इ.बाबत माहिती देण्यात आली.
या महोत्सवात अतिशय मेहनत घेऊन जास्तीत जास्त तृणधान्याचा वापर करून पदार्थ बनविणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.व चार क्रमांक काढण्यात आले.त्यामध्ये 1)अक्षरा कांतीलाल पाटील इ.7वी -प्रथम
2) स्वराज कांतीलाल पाटील 3 री द्वितीय
3)इशांत प्रितम पाटील इ. 6वी तृतीय
4) इशिता प्रकाश भोईर इ.4थी यांनी चौथा क्रमांक पटकाविले.नंतर घोषवाक्य ही घेण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थी,महिला बचत गट व पालकांनी महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे निवेदन दर्शन पाटील यांनी तर आभारप्रदर्शन यतीन म्हात्रे यांनी केले.या महोत्सवात संदीप गावंड,शर्मिला पाटील, श्रीम.ज्योती बामणकर ,गुलाबताई कोळी, DRP काजल पाटील, CRP करूणा भोईर व महिला बचतगट सदस्या उपस्थित होत्या.