महाराष्ट्रहेल्थ कॉर्नर

आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

  • केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था व श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा. संस्थांच्या माध्यमातून उपक्रम

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे ) : केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था व श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि राजू मुंबईकर आणि  संगिताताई ढेरे यांच्या औदार्यातून पेण तालुक्यातील निफाडवाडी,पनवेल तालुक्यातील तारा येथील कोरलवाडी आपटा येथील रामाचीवाडी  या आदिवासी वाड्यांवर डाबर  या नामांकित कंपनीच्या वेदिक चहापावडरची पाकीटं रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसच्या रिअल मँगो बॉटल्स(  एक लिटर ), लीची मिक्स फ्रूट ज्यूस विधानसभा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्याची आवड आणि निवड ही माणसाच्या अंगीकृत स्वभावातून निर्माण होते.आणि हे कार्य करण्याकरिता कुठलीही वेळ – काळ पहिली जात नाही तर मनातील प्रबळ इच्छाशक्तीच या अश्या क्षणांना निर्माण करते ! आणि अश्याच प्रेरणादायी क्षणांनी आज एक सामाजिक कार्य सजलं ते केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था व श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि राजू मुंबईकर आणि  संगिताताई ढेरे यांच्या  औदार्यातून पेण तालुक्यातील निफाडवाडी,पनवेल तालुक्यातील तारा येथील कोरलवाडी आपटा येथील रामाचीवाडी  या आदिवासी वाड्यांवर डाबर  या नामांकित कंपनीच्या वेदिक चहापावडरची पाकीटं रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसच्या रिअल मँगो बॉटल्स(  एक लिटर ), लीची मिक्स फ्रूट ज्यूस पाकीटं( एक लिटर) , नारळ पाण्याच्या बॉटल्स,किराणा सामान, चटई, महिला भगिनी करिता साड्या आणि युवती करिता टॉप्सचं आणि सँनिटरीपॅडचं वाटप  करण्यात आले.

सोबतच राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून एक संकल्परुपी कार्य साकारलं गेलं ते म्हणजे कोरलवाडी  या आदिवासीं वाडीवरील एक गरीब निराधार  आजी- आजोबांना ज्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबात आत्ता कुणीही उरलं नाही.त्या आजी  – आजोबांना किराणा सामान, चटई  देण्यात आल्या  आणि त्यांचं जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत त्यांना लागणारा जीवनावश्यक किराणा सामान हे राजू मुंबईकर  यांच्या कुटुंबाकडून आयुष्यभर पुरविल जाईल असं आश्वासन दिलं.

या कार्यक्रमात आदिवासीं बांधवांच्या वतीनं सर्वांचं स्वागत केलं ते निफाडवाडीचे  माजी सरपंच मारुती कुऱ्हाडे  आणि कोरलवाडी आदिवासीं वरील सामाजिक कार्यकर्ते दामूदादा वाघमारे यांनी केले.

केअर ऑफ नेचर सामाजिक  संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, रायगड भूषण संगिताताई ढेरे  , राणीताई मुंबईकर,सचिनजी ढेरे, सुनिलजी वर्तक  (अध्यक्ष – गोवठणे विकास मंच  ), कविताताई म्हात्रे,वैशालीताई पाटील, वैष्णवीदीदी मुंबईकर, प्रतिक्षादीदी म्हात्रे सोबतच स्नेहलजी पालकर ( कॉन अध्यक्ष ),विलासजी ठाकूर ( कॉन सल्लागार ), अनिल घरत ( उरण तालुका सचिव  आगरी, कोळी, कराडी संघर्ष सा. संस्था), विनोद दादा पाटील ( सामाजिक कार्यकर्ते वेश्वी) आणि निफाडवाडीचे  माजी सरपंच मारुती कुऱ्हाडे कोरलवाडी , रामाचीवाडीचे सामाजिक कार्यकर्ते दामूदादा कातकरी आणि निफाडवाडी, रामाचीवाडी, कोरलवाडी या आदिवासी वाड्यांवरील सर्व आदिवासी बांधव आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button