Adsense
महाराष्ट्र

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात

आमदार कदम सुखरूप ; चालक जखमी

पोलादपूर : दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला मुंबईच्या दिशेने जाताना शुक्रवार (दि.६ रोजी ) रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूरनजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत अपघात झाला आहे. सुदैवाने आ. योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आमदार योगेश कदम हे खेड येथून मुंबईला निघाले असता राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूरनजीक चोळई येथे मागून जाणाऱ्या एका टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर घटनास्थळी उलटला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करित आहेत.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button