आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने अर्थसंकल्पात संगमेश्वर तालुक्याला ३० कोटीचा निधी
देवरूख (सुरेश सप्रे) : चिपळूण – संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्प 2023 मध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या खात्याकडून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी 48 कोटींचा निधी मंजुर केल्याने आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे!
संगमेश्वर तालुक्यातील पुढील कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे :
रा.म.मा. क्र. 66 ते काटे तुळसणी देवरुख मारळ कळकदरा मार्लेश्वर शाखेसह रामा 174 किमी 48/920 मधील ओझरे गावाजवळील अरुंद व कमकुवत पुलाची बंधाऱ्यासह पुनर्बांधणी करणे – 3 कोटी 20 लाख, संगमेश्वर देवरुख साखरपा रस्ता रामा 166 किमी 17/00 ते 18/00 मध्ये सह्याद्रीनागर ते साडवली गावादरम्यान दोन्ही बाजूला काँक्रीटचे गटार बांधणे – 1 कोटी, आरवली माखजन करजुवे डिंगणी संगमेश्वर रस्ता प्रजिमा 43 किमी 10/300 मध्ये संरक्षक भिंतीसह स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे – 80 लाख
आरवली माखजन करजुवे डिंगणी संगमेश्वर रस्ता प्रजिमा 43 किमी 12/00 ते 18/500 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे – 2 कोटी 60 लाख, आरवली -मुरडव- कुंभारखाणी बु. कुचांबे पाचांबे राजीवली रस्ता प्रजिमा 44 (येगाव शाखेसह) किमी 7/00 ते 9/00, 9/500 ते 10/00, 15/600 ते 17/00 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे – 1 कोटी 80 लाख, तुरळ कडवई चिखली तांबेडी अंत्रवली कळंबस्ते रस्ता चिखली शाखेसह प्रजिमा 46 किमी 0/00 ते 5/500 व 0/00 ते 3/500 (मासरंग शाखेसह) सुधारणा व डांबरीकरण करणे व किमी 4/600 मधील पुलाला केसिंग करणे – 3 कोटी 70 लाख
खेरशेत कोकरे नायशी कळंबूशी कासे पेढांबे माखजन नारडुवे शाखेसह रस्ता प्रजिमा 38 किमी 8/00 ते 13/700 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे – 2 कोटी 28 लाख
आरवली मुरडव कुंभारखाणी बु. कुचांबे पाचांबे राजीवली रस्ता प्रजिमा 44 (येगाव शाखेसह) किमी 0/00 ते 30/00 मध्ये रस्त्याचे अस्तित्वातील 3.75 मी. रुंदीचे 5.50 मी. रुंदीकरणसह सुधारणा, डांबरीकरण व भूसंपादन करणे – 3 कोटी
रा.म.मा. क्र. 66 ते तळेकाटे तुळसणी देवरुख मुरादपूर मारळ बामणोली खाडीकोळवण ओझरे कळकदरा मारळ मार्लेश्वर शाखेसह रस्ता रामा 174 किमी 25/500 ते 53/200 व 0/00 ते 4/400 मध्ये रस्त्याची धावपट्टीचे 5.50 मी. चे 7.00 मी. रुंदीकरणासह सुधारणा करणे – 40 लाख 13 हजार
रा.म.मा. क्र. 66 ते तळेकाटे तुळसणी देवरुख मार्लेश्वर कळकदरा रस्ता (मार्लेश्वर शाखेसह रा.म.मा. 204 पर्यंत) रामा 174 मार्लेश्वर शाखा किमी 0/00 ते 4/400 मध्ये डांबरीकरण करणे – 2 कोटी 20 लाख देवरुख (मातृ मंदिर) ओझरे बु. विघ्रवली सोनवडे मुचरी कलंबस्ते काटवली शाखेसह रस्ता प्रजिमा 49 किमी 6/600 मधील लहान पुलाची पुनर्बांधणी करणे – 70 लाख
आरवली मुरडव कुंभारखाणी बु. कुचांबे पाचांबे राजीवली रातांबी येडगेवाडी गायकवाडवाडी रस्ता प्रजिमा 44 किमी 12/300 मधील कमकुवत लहान पुलाची पुनर्बांधणी करणे – 80 लाख
आरवली मुरडव कुंभारखाणी बु. कुचांबे पाचांबे राजीवली रातांबी येडगेवाडीगायकवाडवाडी रस्ता प्रजिमा 44 किमी 23/00 ते 30/00 मध्ये रस्ता रुंदीकरणासह सुधारणा व डांबरीकरण करणे – 3 कोटी 50 लाख तसेत पतन विभागाला ५कोटी निधी मंजूर केला आहे.
या कामांना निधी दिलेबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व कोकणातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आम. निकम यांनी मा विशेष आभार मानले.