कमलाकर घरत यांची रायगड जिल्हा सेवादल अध्यक्षपदी निवड
उरण तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी गोपीनाथ मांडेलकर यांची नियुक्ती
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आज रायगड जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी नविन शेवे गावचे कमलाकर घरत यांची नियुक्ती केली तर उरण तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी माजी चाणजे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष गोपीनाथ मांडेलकर यांची नियुक्ती केली.
आज शेलघर येथील जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सुखःकर्ता बंगलो निवास ऑफिस मध्ये सदर निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरिट पाटील, उरण तालुका इंटक चे अध्यक्ष संजय ठाकूर,काँग्रेसचे जेष्ठ नेते के.डी कोळी, उरण विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, लंकेश ठाकूर, एनएसयूआय उरण तालुका अध्यक्ष आदित्य घरत, आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, यावेळी उपस्थित होते.यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कमलाकर घरत व गोपीनाथ मांडेलकर यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कमलाकर घरत यांची रायगड जिल्हा सेवा दल अध्यक्ष पदी व उरण तालुका सेवादल अध्यक्ष पदी गोपीनाथ मांडेलकर यांची नियुक्ती झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.