काँग्रेसचे लांजातील माजी तालुकाध्यक्ष बापू शेट्ये यांचे निधन
लांजा:- लांजा शहरातील बुजुर्ग नागरिक माजी काँगेस तालुकाध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी, एक अजातशत्रू श्री सुभाष उर्फ बापू शेट्ये यांचे आज सकाळी राहत्या घरी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
श्री. सुभाष शेट्ये हे लांजातील मोठे व्यावसायिक होते. अलिकडे त्यांचा 85 वा वाढदिवस कुटुंबियांच्या समावेत साजरा करण्यात आला होता. प्रजा समाजवादी पक्षातुन त्यानी काम करण्यास सुरुवात केली. लांजा ग्रामपंचायत सदस्य होते त्यानी लाकूड मिल सुरू करून व्यवसाय सुरू केला होता. काँगेस पक्षाचे लांजा तालुका अध्यक्ष असताना गोरगरीब जनतेची सेवा केली.
लांजा शहरात न्यू एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे हिरहिरीने काम केले. एक उत्कृष्ट रंगकर्मी होते हौशी रंगभूमीवर त्यानीं अनेक भूमिका सादर करून कलाकार म्हणूनही छाप पाडली होती. प्रसन्न आणि हेमंत हे दोन्ही मुलगे ही यशस्वी उद्योजक आहेत आणि पक्ष पदाधिकारी आहेत. दोन मुलगे मुली पत्नी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे