किक बॉक्सिंग स्पर्धेत जासईच्या शुभम म्हात्रेला दोन सुवर्णपदके
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे ) : दि. 1 जुलै ते 5 जुलै रोजी झालेल्या वाको इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग सिनियर अँड मास्टर चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालिंदर पंजाब येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र शुभम परशुराम म्हात्रे याने महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करताना किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये
किक लाईट या इव्हेंटमध्ये व -69 या वजन प्रकारामध्ये सुवर्ण पदक व टीम पॉईंट फाईट या प्रकारामध्ये शुभमला सुवर्ण पदक मिळाले असून शुभम दोन सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे त्याच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी त्याला ग्रामपंचायतीमधून व गावातील महात्मा फुले सामाजिक मंडळ जासईचे अध्यक्ष व लोकनेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी व अविनाश पाटील यांनी यांनी स्पर्धेसाठी मोलाची व आर्थिक मदत केली. तसेच या स्पर्धासाठी कोच महाराष्ट्र वाको किक बॉक्सिंगचे अध्यक्ष निलेश शेलार, युथ अकॅडमी अध्यक्ष संतोष मोकल, जीवन ढकवाल,नंदकुमार मोकल, मिलन जाधव, महेंद्र कोळी, शैलेश ठाकूर तसेच मार्गदर्शन म्हणून रायगड किक बॉक्सिंग चे अध्यक्ष सुधाकर घारे (कर्जत) व रायगड किक बॉक्सिंग सेक्रेटरी दीपेश सोळंकी याचे सहकार्य लाभले.
उरण तालुक्यातील जासई गावच्या शुभम म्हात्रे यांनी बॉक्सिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.