कोकण रेल्वेच्या स्वच्छतादुतांची पिळवणूक
स्वच्छतादूत कामगार नेमलेल्या एजन्सीकडून २४ कर्मचाऱ्यांचा प्रश्न
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छतादूत म्हणुन काम करण्याऱ्या २४ कामगारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या पगारातुन साहित्य खरेदीच्या नावाखाली दरमहिना कामगारांकडून पैसे वसूल केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर गेले काही वर्षे एकाच एजन्सीला रेल्वे स्थानक स्वछता आणि गार्ड पेटी ने-आण करण्याचे ठेका देण्यात आला आहे. स्थानिक असलेले सुमारेेे २४ कामगार रात्री-अपरात्री ड्युटी करून रत्नागिरी स्थानक सुंदर स्वच्छ नीटनिटके ठेवण्यासाठी मोलाचे काम करत आहेत. कोरोना काळात या कामगारांनी अतिशय उकृष्ट काम करून रत्नागिरी रेल्वेस्थानक चकाचक ठेवले होते. या कामगारांचे त्यावेळेस कौतुक करण्यात आले होते. आपल्या ड्युटी प्रामाणिक करत असताना या कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्यये दोन तीन महिने पगारास विलंब होत असतो. सुमारे ११ हजार रुपये पगार बँकेत जमा झाल्यानंतर या कामगारांकडून लगेच रोख रक्कम वसूल केली जात आहे. साहित्य खरेदी करण्यासाठी ही रक्कम वसूल केल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ठेकेदार हाच साहीत्य खरेदी करणार असा नियम लागू आहे.
या कामगारांना महिन्यामध्ये चार रजा मंजूर असताना केवळ महिन्यात दोनच रजा देण्यात येतात. एजन्सीच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांच्याकडून हात वर केले जातात. तक्रार करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्याचे आदेशवजा धमकी देण्यात येते. तरी या कामगारांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी स्वच्छतादूत म्हणुन काम करण्याऱ्या २४ कामगारांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.