गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवात उद्या शास्त्रीय अभंग-नाट्य संगीत मैफल
श्रीधर पाटणकर व करुणा पटवर्धन यांचे सादरीकरण
रत्नागिरी : गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिरात सुरू असलेल्या माघी गणेशोत्सव अंतर्गत उद्या दि. 27 रोजी जानेवारी २०२३ रोजी ‘स्वरार्पण’ ही संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आज दि. 26 जानेवारी रोजी उत्सवातील पाचव्या दिवशी नेत्रदीपक अशी आरास करण्यात आली होती.
मंदिरातील उर्वरित कार्यक्रमांमध्ये दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसाद ( रथसप्तमी ), याचबरोबर रविवार दिनांक 22 ते गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत डोंबिवली येथील ह.भ.प. श्री. मोहक प्रदीप रायकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘स्वरार्पण’ ही शास्त्रीय, अभंग व नाट्यसंगीताची मेजवानी असलेली मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीधर पाटणकर व करुणा पटवर्धन यांचे सादरीकरण होणार आहे.