गुहागरात वर्षभरात सुमारे ४४६ जणांना विंचूदंश तर ९२ जणांना सर्पदंश
गुहागर : तालुक्यात चालू वर्षात सुमारे ४४६ जणांना विंचूदंशाची लागण झाली असून, ९२ जणांना सर्पदंश लागण झाली तर ३२३ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगिड यांनी दिली.सुदैवाने, वर्षभरात विविध प्रकारच्या कोणत्याही दंशामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याने वेळेत योग्य ते उपचार झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ग्रामीण भागात साधारणतः भातकापणी हंगामात विंचू व सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते.
साधारणतः ऑक्टोबर ते मे असा उन्हाचा हंगाम असल्याने या दरम्यान ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढते असते. यावर्षी गुहागर तालुक्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सर्प, विंचू, कुत्रा आणि इतर दंश आकडेवारी गुहागर तालुका आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
हे देखील वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!