चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलतर्फे ‘डॉक्टर आपल्या गावी’ उपक्रमामध्ये कृषिकन्यांचा सहभाग

Team RatnagiriLive
1 Min Read

आबिटगांव  (चिपळूण ): चिपळूण आबिटगाव 7 जुलै : आबिटगांव ग्रामपंचायत येथे चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्यातर्फे राबविण्यात अलेल्या महाआरोग्य सप्ताह 2025 ‘डॉक्टर आपल्या गावी’ या मोफत तपासणी शिबिरामध्ये कृषीकन्यांनी आपला सहभाग दाखवून सहकार्य केले.

सकाळी १० ते १ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात सुमारे १०० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य सल्ला यांचा समावेश होता. शिबिरासाठी विविध तज्ञ डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते. ‘डॉक्टर आपल्या गावी’ या उपक्रमामुळे घराजवळच मोफत तपासणीची सुविधा मिळाल्यामुळे खूप सोईचे झाले असे मत गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले.

शिबिराचे आयोजन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण संचलित चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल मांडकी आणि गोविंदरावजी निकम कृषी महावि‌द्यालय मांडकी पालवण यांच्या चतुर्थ वर्ष कृषिकन्यां यांच्या संयुक्त विद्यामानाने करण्यात आले होते. यामध्ये अमिषा कोळी, वृषाली गोफणे, दिक्षा खांडेकर, सृष्टी काळे, प्रज्ञा गोठणकर, साक्षी गूरव, साक्षी अवतार, मयुरी ढेकळे, मृणाल उपाध्ये, प्रिती पेरवी या कृषिकन्यांचा सहभाग होता.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment