महाराष्ट्रराष्ट्रीय

ठाकूरवाडी गावावर मोठी दरड कोसळून पाचजणांचा मृत्यू ; १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ अडकल्याची भीती

माळीण दुर्घटनेची पुन्हा एकदा आठवण

रायगड :  गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रायगड तालुक्यातील खालापूरमधील ठाकूरवाडीला बसला आहे. खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या दुर्घटनेने माळीण दरड दुर्घटनेच्या भयंकर आठवणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी रवाना झाले आहेत.चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी असून तेथील दरड रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे इथे असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 90% वाडी ढिगाऱ्याखाली गेली आहे. 30 ते 35 आदिवासी बांधवांच्या घरांची मोठी वस्ती होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. जवळपास १०० हून अधिक लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. तर एका महिलेसह दोन लहान मुलांना वाचविण्यात बचाव कार्य पथकाला आतापर्यंत यश आले आहे. वर अजूनही माती पडत असल्याने बचावकार्य करणाऱ्यांनाही धोकाच निर्माण झाला आहे.

डी.सी. दत्तात्रय नवले आणि डी.सी. सर्जेराव सोनवणे यांना अनुक्रमे वैद्यकीय मदत, बचाव आणि निवारा व्यवस्था ऑपरेशन्ससाठी ओएसडी म्हणून नियुक्त केले आहे. घटनास्थळी चार रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. आरएच चौकात तालुका आरोग्य अधिकारी आणि चार डॉक्टरांसह चार रुग्णवाहिका सज्ज आहेत. खाजगी डॉक्टरांचीही मदत टीएचओ ने बोलावली आहे. एकूण ४० ते ४५ घरांची वाडी या दरडीखाली अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून ३० ते ३५ घरांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button