डाॅ. शंकर लोकरे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘प्राच्यविद्या शिरोमणी’ पुरस्कार
गुहागर : रत्नागिरीचे सुपुत्र श्री स्वामी दत्त फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ. शंकर लोकरे (आण्णाजी) यांची राष्ट्रीय पातळीवर “प्राच्यविद्या शिरोमणी” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून श्री जैन प्राच्यविद्या अनुसंधान संगठन, इंदौर (मध्य प्रदेश) संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
श्री जैन प्राच्यविद्या अनुसंधान संगठनच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती आभा जैन व राष्ट्रीय समितीकडून शोधपत्र, वास्तू-अंकशास्त्र शोधनिबंध व अध्यात्मिक,सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे.
दि. ५ मार्च रोजी इंदौर (मध्य प्रदेश) येथे होणार्या प्राच्यविद्या अधिवेशन व अलंकरण समारंभात डाॅ.श्री.शंकर लोकरे (आण्णाजी) यांना मान्यवरांच्या हस्ते “प्राच्यविद्या शिरोमणी” हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च ५ विद्वान व्यक्तींनाच दिला जातो. ह्या वर्षी भारतातील ५ सर्वोच्च विद्वानांमध्ये डाॅ.शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांची निवड करण्यात आली आहे.
श्री स्वामी दत्त फाऊंडेशन आणि श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामाजिक आणि अध्यात्म क्षेत्रात अविरत वेगवेगळे उपक्रम लोकांपर्यत पोहोचवून अंधश्रद्धा निर्मुलन करून सनातन वैदिक मंत्राचा प्रचार व प्रसार करत आहेत. तसेच डाॅ.शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांनी सादर केलेला ज्योतिष,वास्तू आणि अंकशास्त्रातील गुढ शोधनिबंध राष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद ठरला आहे. ह्याआधी श्री स्वामी दत्त फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ.शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांना ३४ राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.