देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरा तील देऊळवाडी येथील श्री संगमेश्वर महादेव देवस्थान (श्री शंकर मंदिर )हे प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र असून दर सोमवारी, महाशिवरात्रीला येथे भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. भक्तांना योग्य सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी कार्यकते नेहमी प्रयत्नशील असतात. महाशिवरात्रीनिमित्त देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे भाविकांना दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी उपवासाचे साबुदाणाचे खिचडी, शेंगदाणे, दूध, लस्सी आदी पदार्थाचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या प्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
देऊळवाडी युवक मंडळाचे तसेच देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे निरंजन नार्वेकर, संतोष चव्हाण, प्रफुल्ल म्हात्रे,महेश झुजम, तुषार म्हात्रे, मंगेश म्हात्रे, योगेश शेलार, विपुल झूजम,सतीश पुजारी, जतिन तवसाळकर, प्रवीण सुर्वे, प्रसाद म्हात्रे, विठ्ठल ममताबादे, रोमेश भुवड,भूषण म्हात्रे, आकाश जाधव,निशांत चव्हाण,आशिष न्यायी, साईनाथ ममताबादे,वेदांत नाईक,रोहन पटेल, चिराग पटेल, गिरीश गुडेकर अमित राव, कमलाकर घरत आदी पदाधिकारी-सदस्य यावेळी उपस्थित होते.
देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ व देऊळवाडी युवक मंडळाचे पदाधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत प्रसादाचे वाटप मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ,शितळा देवी बचत गट देऊळवाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व गावातील महिलांनी विशेष मेहनत घेतली.