Adsense
महाराष्ट्र

नशामुक्ती अभियाना अंतर्गत २६ जानेवारीपर्यंत विविध उपक्रम

सुरभी संस्थेतर्फे संविधान बांधिलकी महोत्सवांतर्गत आयोजन

अलिबाग : रायगड जिल्हा प्रशासन, सुरभी स्वयंसेवी सामाजिक संस्था, अलिबाग तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समिती व टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान बांधिलकी महोत्सव दि.26 नोव्हेंबर 2022 ते दि.26 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेण्यात येत असून यामध्ये संविधान बांधिलकी संविधान कार्यशाळा, नशामुक्त भारत इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सुरभी सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया जेधे यांनी दिली.


दि.02 डिसेंबर 2022 रोजी प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (PNP-NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमसंस्कार शिबिर सायरस पूनावाला सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, नागाव तसेच संपर्क बालग्राम अनाथ आश्रम येथे पेझारी बांधन,ता.अलिबाग येथे घेण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती व त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन व सादरीकरण करण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सुरभी स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती-काळाची गरज, वैज्ञानिक दृष्टीकोन, स्त्री-पुरुष समानता, लिंगभाव, संवाद मंच इत्यादी विषयांवर चर्चा व परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. याकरिता 45 विद्यार्थ्यी उपस्थित होते. तसेच तेथील व्यवस्थापक श्री.कुंभार व श्रीमती शीतल यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनित म्हात्रे व सहाय्यक महिला व बालविकास अधिकारी श्री.अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य विभाग प्रमुख आरती नाईक व अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडचे सचिव संदीप गायकवाड तसेच सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया जेधे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दि.05 डिसेंबर 2022 रोजी जे.एस.एम. कॉलेज एन.एस.एस. कॅम्प. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर जनार्दन नारायण म्हात्रे रंगमंच मध्ये मानिभुते ता.अलिबाग जि. रायगड येथे संपन्न झाले. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे अशोक पाटील यांनी सुरभी संस्था, टाटा मेमोरियल हॉस्पिटल व जे.एस.एम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या नशा केल्यामुळे होणारे मानवी जीवनावर होणारे विविध परिणाम, कॅन्सर, व्यसनाधीनता यामुळे कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक होणारे नुकसान या विषयांवरील मार्गदर्शन संगणकीय सादरीकरणातून केले. यावेळी सुरभी संस्थेचे मानसोपचारतज्ञ डॉ.अनिल डोंगरे यांनी युवकांना व्यसनापासून मुक्त होण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी दिनेश मुसळे व जे.एस.एम. कॉलेज प्रा. झेंडे, प्रा. मुटकुळे विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button