‘नासा- इस्रो ‘साठी पात्र ठरलेल्या आरोही सावंतचा कोळंबे प्रभागातर्फे सत्कार
संगमेश्वर : कोळंबे हायस्कूल ता. संगमेश्वर येथे ‘नासा- इस्रो दर्शन’ या जि.प. रत्नागिरी तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या आणि इस्रो व नासा, अमेरिका भेटीसाठी पात्र ठरलेल्या जि. प. शाळा ओझरखोल केंद्र कुरधुंडा बीट कोळंबे या शाळेतील प्रज्ञावान विद्यार्थिनी आरोही दिनेश सावंत या विद्यार्थिनीचा कौतुक व सत्कार सोहळा, कोळंबे बीटचे विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने व बीटमधील कुरघंडा उर्दू, डिंगणी, आंबेड, आणि कोंडये या चारही केंद्रांचे केंद्रप्रमुख आणि सर्व शिक्षकांचे उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कोळंबे बीटमधील शिक्षक व अधिकारी यांचे तर्फे सॅमसंग गॅलक्सी-टॅब शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. आणि नासा- अमेरीका वारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकास्तरापर्यंत मजल मारलेल्या उर्वरित १० विद्यार्थ्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. त्याचबरोबर कुमारी-आरोहीचे पालक आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेला- प्रथमेश प्रदीप दसम, शाळा-कोंडये नं.-२ केंद्र कोंड्ये याचाही मा. विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांच्यातर्फे एक हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कोळंबे हायस्कुलचे मुख्या. संजय मुळ्ये व शिक्षक उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी कोळंबे हायस्कूल यांचेतर्फे करण्यात आलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल विस्तार अधिकारी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निढळेवाडी येथील पदवीधर शिक्षक मधुकर वाजे यांनी केले. ही बीटस्तरीय परिषद यशस्वी करण्यासाठी इब्राहिम मुल्ला केंद्रप्रमुख सुदेश मोहिते, गणेश लोलेवार , पंडितराव ढवळे, पद्माकर हर्डीकर, अब्दुल रहीम यांनी विशेष मेहनत घेतली.