महाराष्ट्र

नियंत्रण सुटलेल्या ट्रकने तब्बल ११ वाहनांना ठोकरले

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली येथे अपघात

खोपोली (रायगड ) : मुंबई पुणे द्रोतगती मार्गावर आज ( गुरुवारी) दुपारी बारा 12:55 मिनिटाचे सुमारास मुंबई लेन वर खोपोली एक्झिट या ठिकाणी द्रुतगती मार्गाचे काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक थांबवलेली होती. त्यावेळेस पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक KA -05-3105 यावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर थांबलेल्या वाहतुकीमधील एकूण अकरा वाहनांना पाठीमागून ठोकर मारून अपघात केला आहे. या अपघातामध्ये एकूण सहा व्यक्ती किरकोळ जखमी झालेल्या असून त्यांना औषधोपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


अपघात स्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.

अपघातग्रस्त वाहने खालील प्रमाणे :-

  1. MH-01-CR -1745,
  2. MH-48-AW-7114,
  3. MH -20-EY-8841,
  4. MH-12-HN-4427,
  5. MH-02-BZ-3845,
  6. MH-46-X-4269,
  7. MH-22-AN-0818,
  8. MH-01-BU-9745,
  9. MH-14-KQ-0305,
  10. MH-03-BC-6914,
  11. MH-12-TN-7520.

अपघात ग्रस्त ट्रक चा नंबर :-
KA-56-3105 च्या चालका विरुद्ध क. २७९, ३३७,३३८ IPC अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी पळुन गेला असुन शोध सुरु आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button