महाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनासाठी सजली ‘रत्ननगरी’!
रत्नागिरी : प्रजासत्ताक दिन सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना रत्नागिरी नगरी तिरंगामय झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिन दोन दिवसांनी साजरा होत आहे. हे औचित्य साधून शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकांमधील विद्युत खांबांसह मोक्याच्या ठिकाणच्या चौकांमध्ये करण्यात आलेली व प्रजासत्ताक दिनाचा फील आणणारी विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गुरुवारी संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांमध्ये असलेल्या विद्युत खांबांचे रुपडे विद्युत रोषणाईने पालटले आहे. शहरात नागरिकांमध्ये देशाप्रतीची भावना जागृत करणारी ही विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे