भरगच्च कार्यक्रमांचा भेंडखळळ महोत्सव ६ जानेवारीपासून
उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री जरीमरी आई नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ-उरण यांच्या सौजन्याने दि. ६ ते ८ जानेवारीया कालावधीत उरण तालुक्यातील भेंडखळ येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी भेंडखळ महोत्सव 2023 (पर्व 2रे) चे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 06 जानेवारी रोजी श्री जरी मरी आई देवीचा अभिषेक, उदघाटन सोहळा,चित्रकला स्पर्धा, बेंजो स्पर्धा, महिलांचे भजन, होम मिनिस्टर, गाथा भेंडखळ गावाची, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी मॅरेथॉन स्पर्धा, कवी संमेलन, शालेय मुलांच्या स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ, मंगळागौर स्पर्धा, कराटे स्पर्धा, अनुभव प्रवासाचा तर 8 जानेवारी रोजी शालेय मुलांच्या स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, सुरेल गीतांचा कार्यक्रम,सर्प प्रदर्शन, नृत्य स्पर्धा बक्षीस वितरण आणि सांगता समारोह असे विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विठोबा देवस्थान भेंडखळ, महिला मंडळ भेंडखळ, भेंडखळ क्रिकेट क्लब, रा.जि.प शाळा,भेंडखळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भेंडखळ यांच्या विशेष सहकार्याने या भेंडखळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी श्री जरी मरी आई नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळचे अध्यक्ष किरण अनंत घरत फोन नंबर 90047 55655 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.