महाराष्ट्र
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात २६ रोजी ध्वजवंदन कार्यक्रम
मुंबई : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या आवारात गुरुवार, दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन आणि भारतमाता पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईतील प्रदेश कार्यालयात सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास यावेळी ध्वजवंदन सतीश जी, राष्ट्रीय संघटक, भाजपा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसाद ओक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते, ॲड.राज के. पुरोहित, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई 400 020 येथे हा कार्यक्रम होणार आहे.