मराठी पत्रकार परिषदेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी आनंद तापेकर ; उपाध्यक्षपदी सुरेश सप्रे, प्रसाद रानडे यांची निवड
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांचे उपस्थितीत नुकतीच निवड करण्यात आली. बैठकीप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक व मिलिंद अष्टीवकर यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
यामध्ये आनंद तापेकर-अध्यक्ष, राजेश शेळके- कार्याध्यक्ष, मनोज पाटणकर- सचिव, रहिम दलाल- सहसचिव, *सुरेश सप्रे- उपाध्यक्ष, समीर जाधव- उपाध्यक्ष, प्रसाद रानडे- उपाध्यक्ष, जगदिश कदम- कोषाध्यक्ष, सुभाष कदम- सल्लागार अशा प्रकारे निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कोकण संघटक हेमंत वणजू, राज्य उपाध्यक्षा सौ.जान्हवी पाटील, मंत्रालय विधीमंडळ संघाचे अध्यक्ष. रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रशांत पवार, डीजिटल मिडिया रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान, प्रसिद्धीप्रमुख जमीर खलफे प्रशांत हरचेकर तसेच जिल्ह्यातील मराठी परिषदेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.