Adsense
महाराष्ट्र

महेंद्र घरत एक आदर्श पुत्र : आयुक्त गणेश देशमुख

उरण (विठ्ठल ममताबादे ) : खऱ्या अर्थाने मातृभक्त असलेले कामगार नेते महेंद्र घरत यांचे समाजकार्य सर्वतोपरी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार क्षेत्रात काम करत असतांना तसेच राष्ट्रीय राजकारणात आपली वेगळी छाप पाडत असतांना आपल्या परिवाराकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. आपल्या मातोश्रींच्या नावे असलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माधमातून मराठी शाळांना २५० हून अधिक संगणक तर आठ रुग्णवाहिका, गरीब गरजूंना घरांसाठी मदत, औषधोपचार, मुलांना शिक्षणासाठी मदत ते नेहमीच करत असतात. आज सुद्धा मातोंश्रींच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्ताने शेलघर गावातील प्रकाश भगत ज्यांचे घर सिडकोने तोडले होते त्यांना राहायला घर नव्हते त्यांना महेंद्र घरत यांनी घर बांधून दिले त्याच्या चाव्या आज त्यांच्याकडे सुपूर्त केल्या. तसेच पनवेल येथील अंत्यविधी सेवा संस्था, ही संस्था बेवारस मृत व्यक्तींचे अंतिमसंस्कार करते या संस्थेला महेंद्र घरत यांनी रुग्णवाहिका भेट देवून आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण केली. खऱ्या अर्थाने आज त्यांच्या मातोश्रींना स्वर्गात समाधान वाटत असेल व आपल्या मुलाचा अभिमान वाटत असेल . “पुत्र हवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” असे म्हणत आयुक्त गणेश देशमुख यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचा कार्याचा गौरव केला.

एक आदर्श पुत्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे कामगार नेते महेंद्र घरत होय.असे गौरवोदगार पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी काढले.

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर या संस्थेच्या वतीने शनिवार दि.11 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता शेलघर येथे स्त्री सन्मान पुरस्कार, रुग्णवहीका लोकार्पण व मोफत घरे हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित असलेले पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कार्याचे कौतुक केले.

समाजामधील महिलांना सन्मान देण्याचे काम महेंद्र घरत यांनी नेहमीच केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, कामगार, क्रीडा व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नवरत्न महिलांचे आपल्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान केला या मध्ये, कल्पना किशोर देसाई ( मुंबई ), नंदाताई राजेंद्र म्हात्रे ( पेण ), स्नेहल जगताप ( महाड ), श्रीमती. नंदाताई माधवराव भोसले ( भांडूप ), भाग्यश्री भुर्के ( बांद्रा ), स्वप्नाली संजय म्हात्रे ( पनवेल ), शितल ठक्कर ( पनवेल ), श्रीमती. शर्मिला नाईक ( नवी मुंबई ), अक्षता पंकज पाटील ( उरण ), यांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पनवेल महानगर पालीका आयुक्त गणेश देशमुख , शिवसेना नेते बबनदादा पाटील,आदर्श डॉक्टर गिरीष गुणे, शिव व्याख्याते प्रकाश देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा चारुलता टोकस, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर, म.प्र.काँ. क. सदस्य मिलिंदजी पाडगावकर, उद्योजक तुकाराम दुधे, एनयुएसआयचे मिलिंदजी कांदळगावकर , उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी खालापूर ता. अध्यक्ष कृष्णाशेठ पारींगे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल तसेच जिल्ह्यातील शेकडोच्या संखेने महिला व पुरुष उपस्थित होते.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button