महाराष्ट्र
माजी मंत्री रवींद्र वायकर यांना मातृशोक
मुंबई : रत्नागिरीचे माजी पालकमंत्री व उ.बा.ठा. शिवसेनेचे आमदार रविंंद्र दत्ताराम वायकर यांच्या मातोश्री पार्वती दत्ताराम वायकर ( ८६) यांचे आज शुक्रवार दि.७ जुलै २०२३ रोजी अल्पशः आजाराने निधन झाले.
अंत्यदर्शनासाठी पार्थिव लिली व्हाईट, बी विंग 806 येथे ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर दुपारी स्व.राजेश्वर रागिनवार हिंदू स्मशानभूमी प्रतापनगर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी पूर्व येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.