मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना अखेरपर्यंत दिली साथ
मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.
लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. सेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांना अखेरपर्यंत साथ
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना व कार्यकर्त्यांना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागत आहे. अशात ही अग्नी परीक्षा नको असेल तर आमच्यासोबत शिंदे गटाने दिली अप्रत्यक्ष ऑफर दिली ती त्यांनी धुडकावून लावत उद्धव ठाकरे सोबतच राहीले. मात्र, विश्वनाथ महाडेश्वर यांनी अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ दिली.
कोकणदौरेत ते ठाकरे सोबतच होते. ते अनिल परब यांचे निकटचे सहकारी होते.
त्यांचे पश्चात पत्नी माजी नगरसेविका पुजा महाडेश्वर व दोन मुले असा परिवार आहे. त्याचेवर साय. ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..
विश्वनाथ महाडेश्वर यांची अशी राहिली कारकीर्द
2002 – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड
2003 – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
2007 – बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
2012 – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
2017 – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड.