महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २६:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्र, गोवा-दमण मुक्ती आणि विविध सामाजिक चळवळीत ते अग्रभागी राहिले. आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडणारे पत्रकार, त्यासाठी आंदोलन करणारा सामाजिक कार्यकर्ता अशा विविध रुपात त्यांनी अविरत कार्य केले. आणीबाणीतही त्यांनी कारावास भोगला. गरिबांसाठी, वंचितांसाठी झटणारे समाजकारण-राजकारण आणि पत्रकारितेत आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली.