मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत!
रत्नागिरी : दोन महिन्यात दुसऱ्यांदा रत्नागिरी भेटीवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. यापूर्वी दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे रत्नागिरीत आगमन झाले आहे.
शासकीय विमानाने मुख्यमंत्र्यांचे रत्नागिरी येथील विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. विमानतळावरील स्वागतानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नियोजित कार्यक्रमांच्या स्थळी रवाना झाले.