महाराष्ट्र
रत्नागिरीतील माहेर संस्थेत उभारली चक्क पुस्तकांची गुढी!
रत्नागिरी : रत्नागिरी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतात. या वर्षी गुढीपाडवा हा सण देखील उत्साहाने पार पडला.
या गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे ते ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकांना वाचणे, माहिती करून घेणे हे फार गरजेचे आहे. त्या निमित्ताने पुस्तकांचा सन्मान व्हावा. यासाठी आजच्या मराठी नवीन वर्षाच्या दिनानिमित्त पुस्तक रुपी गुढी उभारण्यात आली. संस्थेतील प्रवेशितांना पुस्तकाचे महत्व पटवून देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या संकल्पनेने साकारण्यात आला.