महाराष्ट्रलोकल न्यूज

रत्नागिरीत २३ मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि जिल्हा उदयोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” दि.२३ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे.


या रोजगार मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनाकडून ५०० हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आलेली आहे. तरी पुढील शैक्षणिक १०वी/१२वी / पदवीधर/आय.टी.आय / इंजिनिअर व इतर या शैक्षणिक पात्रतेसाठी योजनेचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा.
रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडेटा व इतर कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे.


तरी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२३५२ २२१४७८/२९९३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी श्रीम. इनुजा शेख यांनी केले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button