राज्यातील दिव्यांगासाठी मोठा निर्णय विचारधीन
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत
पुणे : राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधिल असून इतर घटकांप्रमाणे दिव्यांगासाठी देखील राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, दिव्यांग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद, श्री समर्थ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.