महाराष्ट्र
राष्ट्रीय ग्राहक दिनी पथनाट्यातून जनजागृती
अलिबाग (जिमाका) : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त दि. 24 डिसेंबर 2022 रोजी या वर्षीचा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी केंद्र शासनाकडून Effective disposal of cases in Consumer Commissions अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
आज शनिवार, दि.24 डिसेंबर 2022 हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाकडून अलिबाग बीच येथे सकाळी 11.00 वा. तर अलिबाग बाजारपेठ (बस स्टँड जवळ) येथे दुपारी 12.20 वा. प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्यामार्फत पथनाटयातून जनजागृती करण्यात आली.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक दिन साजरा करण्यात आला.